- Advertisement -spot_img
Homeसामाजिक उपक्रमलोणीकंद पोलिसाच्या वतीने शालेय विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्य भेट

लोणीकंद पोलिसाच्या वतीने शालेय विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्य भेट

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
पोलीस म्हटलं की भीती हे लहान मुलांपासून ते अगदी पोलीस स्टेशन ची कधीही पायरी न चढलेल्या लोकांचे समीकरण पण याला फाटा देत लोणीकंद पोलीस स्टेशन च्या पोलिसांनी याच विचारांना फाटा देत एका विद्यार्थ्यांला शैक्षणिक साहित्य देत आगळ्या वेगळ्या पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी केली. पोलीस दलाच्या या सामाजिक उपक्रमाचे सध्या परिसरात कौतुक होत आहे.
पुणे शहर पोलीस दलाच्या लोणीकंद पोलीस स्टेशन येथे वाघोली येथील विष्णुजी शेकोजी सातव विद्यालयातील एका गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यास मदत स्वरूपात शालेय गणवेश देत अनोखी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.
सातव हायस्कूलमध्ये एका कार्यक्रमानिमित्त पोलीस कर्मचारी राहुल कोळपे व रितेश काळे उपस्थित असताना या विद्यार्थ्याने प्रभावीपणे भाषण करत असताना प्रभावित केल्याने या विद्यार्थ्याविषयी प्राचार्यांमार्फत माहिती मिळवत हा विद्यार्थी परिस्थितीने गरीब व शाळेत हुशार असल्याची समजले. मदतीच्या भावनेने लोणीकंद पोलीस स्टेशनच्या वतीने या विद्यार्थ्यास गणवेश व शालेय शिक्षणासाठी आर्थिक स्वरूपात मदत करण्यात आली. यावेळी या विद्यार्थ्याने पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त करत भविष्यात मोठा अधिकारी होऊन केलेल्या मदतीची परतफेड करेल अशी भावना व्यक्त केली.
यावेळी लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे, सीमा ढाकणे पोलीस निरीक्षक गुन्हे, पोलीस निरीक्षक गुन्हे मारुती पाटील, सायबर क्राईमचे सुरेश गोरे, सहा. पो. नि. सुरज राजगुरू, सहा. पो. नि. गजानन जाधव, रामकृष्ण दळवी, कुणाल सरडे, महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह इतरही पोलीस कर्मचारी उपस्थित होते.


पोलीस ठाणे म्हटलं की भीती वाटायची. मात्र गुरू पौर्णिमेनिमित्त मला पोलीस ठाण्यात बोलावून पोलीस काकांनी मला मदत केली. त्यामुळे भीतीही दूर झाली व मला गुरूंकडून मदत मिळाली. मदतीचा हाच हात मी ही पुढे करून भविष्यात गरजू गरिबांना मदत करेल. “
– अंजित खंडागळे, विद्यार्थी, सातव विद्यालय.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page