हिरडस मावळ प्रतिनिधी : दिपक पारठे
भोर स्थानकातून दुपारी दीड च्या सुमारास मळे या ठिकाणी ४० प्रवाशी घेऊन निघालेल्या एस.टी.चा वाढाने गावाच्या हद्दीमध्ये दि. ६ रोजी दुपारी अपघात झाला.
सध्या या भागात पाऊस चालू असल्यामुळे अपघात होण्याच्या घटना घडत असतात. त्यातच भोर ते मळे ही एस.टी. समोरील आलेल्या वाहनाला साईड देताना एस. टी. चे चाक पोकळ जागेत रुतल्याने हा अपघात झाला.
रस्त्याच्या साईड पट्ट्या भरीव नसून पोकळ स्वरूपाच्या असल्यामुळे व गटर साईडला उंचवटा असल्यामुळे एस. टी. बस हळू हळू कोसळली त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही.

या मार्गावरील रस्ता अरुंद असल्यामुळे वाहनांना साईड देताना अक्षरशः चालकांना कसरत करावी लागते तसेच साईड देताना अनेक वाहन चालकांमध्ये भांडण देखील होत असतात. तरी या मार्गावरील साईड पट्ट्या व रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर भरण्यात याव्यात अशी मागणी प्रवाशी ,नागरिक, व वाहन चालकांकडून होत आहे.





