गुन्हे शाखा व वाहतूक विभाग यांची संयुक्त कारवाई
गजानन गव्हाणे पाटील
लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मा. वरिष्ठांच्या आदेशाने बीजेएस कॉलेज परिसर (वाघोली) भागात वाघोली वाहतूक पोलीस व युनिट ६ पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मिळून तब्बल १६ वाहनांवर दंडात्मक कार्यवाही केली.
यामध्ये विना वाहन परवाना, ट्रिपल सीट, बुलेट सायलेन्सर, मोबाईल टॉकिंग अश्या कार्यवाह्या करण्यात आल्या. तसेच कॉलेज व शाळा प्रशासन यांना काही अनुचित प्रकार घडत असल्यास संपर्क साधण्याबद्दल आवाहन करण्यात येत आहे.

सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे २ सतीश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ६ कडील पोलीस अधिकारी उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, पो. ना. रमेश मेमाणे, प्रमोद मोहिते, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, सचिन पवार, ज्योती काळे, वाघोली वाहतूक विभागाचे पो ना बारीकराव राख, योगेश शिंदे यांनी संयुक्तरित्या केली.





