गजानन गव्हाणे पाटील
” गुरुशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय आत्मा नाही
ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म सर्वकाही गुरूंचीच देन”
“ना वयाचे बंधन, ना नात्याचे जोड
ज्याला आहे अगाध ज्ञान, जो देई नि:स्वार्थ दान,
गुरु त्यासी मानावा, देव तेथेची जाणावा, या उक्तीप्रमाणे शिरुर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील ज्ञानांकुर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सनराईज इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी संस्थेचे संस्थापक व कोरेगाव भीमा विकास सोसायटीचे माजी चेअरमन उद्योजक संजय फडतरे यांनी सर्व शिक्षकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देत त्यांचा सन्मान केला. यावेळी संचिती शिंदे, रिद्धी सालके, श्रेयश चौधरी, समृद्धी ठोंबरे, अनुष्का चौबे या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतीक्षा लंघे – घुटे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती शिंदे, अनिता झावरे, शिल्पा मेस्तरी, निर्मला मुरकुटे, शीतल ताठे, गीता ढगे, अश्विनी उन्हाळे, मिलिंद गायकवाड, रोहिणी शिंदे, स्वप्नाली घावटे, वंदनाकुमारी, सुप्रिया कुंभार, मनीषा वाघमारे, संगीता पारखे, रोहिणी शिंदे, सुप्रिया चौधरी, सुवर्णा देशपांडे, माधव बढे, तनुश्री नायक, संजय पेनटुले यांचा सन्मान करण्यात आला.





