गजानन गव्हाणे पाटील
फुलगाव, ता. हवेली येथील डायनापॅक प्रा. लिमिटेड, ग्रामपंचायत फुलगाव तसेच ग्रामस्थांच्या पुढाकाराने गावातील शाळांमध्ये विविध प्रकारच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. तर यावेळी वृक्षांच्या बीजाचे देखील वाटप करत प्रत्येकाने जिथे जागा मिळेल तिथे लावण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

यावेळी बोलताना व्यवस्थापकीय संचालक अभिजित सोम यांनी जागतिक तापमान वाढीवर चिंता व्यक्त करत आपल्या पुढील पिढीला चांगले आरोग्य लाभण्यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करून ती जगविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करत प्लास्टिक मुक्तीसाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तर गावासाठी नेहमी सहकार्य करणाऱ्या डायनापॅक कंपनीचे आभार मानत आपली समाजाप्रती व निसर्गाच्याप्रती असलेल्या जबाबदारीमुळे वृक्षतोड न करता ती बांधावर, मोकळ्या जागेत वृक्ष लावावीत असे आवाहन लोकनियुक्त सरपंच मंदानानी साकोरे यांनी केले.

याप्रसंगी माजी उपसरपंच राहुल वागस्कर, संध्या शिनगारे, ज्योती गवारे, निर्मला वागस्कर, उज्वला खुळे, योगेश कोळपकर, विशाल वंजारे, नैना खुळे, भांबरे गुरुजी, चव्हाण सर, अतुल शिवले, सोमनाथ गवारे, डायनॅपॅक निती आनंद व्यवस्थापक एचआर तसेच अमोल जोशी, अल्फाज पटाइट, अमित देशपांडे, दादासाहेब ढोकले, बिधु मोहंती, प्रदीप शिंदे, सुधीर चौधरी, अनुभव माहेश्वरी, लक्ष्मीकांत केंद्रे आदी यावेळी उपस्थित होते.





