- Advertisement -spot_img
Homeक्राईमअज्ञात इसमाकडून हिर्डोशी विद्यालयाच्या दरवाज्याची तोडफोड करून नुकसान

अज्ञात इसमाकडून हिर्डोशी विद्यालयाच्या दरवाज्याची तोडफोड करून नुकसान

- Advertisement -spot_img

हिरडस मावळ प्रतिनिधी : दिपक पारठे
भोर तालुक्यातील हिरडस मावळातील राजगड ज्ञानपीठ संचलित श्री समर्थ रामदास स्वामी माध्यमिक विद्यालय हिर्डोशी येथे शुक्रवार दि.30 रोजी रात्रीच्या वेळेस अज्ञात इसमाने ऑफिस च्या दरवाज्याची तोडफोड करून नुकसान केले.
दुसऱ्या दिवशी जेव्हा शिक्षक व मुख्याध्यापक शाळेत आल्यानंतर सदर बाब त्यांच्या लक्षात आली असता त्यांनी ताबडतोब भोर पोलीस स्टेशन चे बीट हवालदार उद्धव गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता बीट अंमलदार उद्धव गायकवाड यांनी ताबडतोब घटनास्थळी भेट देऊन झालेल्या घटनेची पाहणी केली. तसेच त्यांनी इथून पुढे अशा घटना होऊ नये तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी व शाळेतील ऑफिस च्या दप्तर सुरक्षेसाठी सी सी टी व्ही बसवण्याची सक्त गरज आहे. या विषयी सूचना देऊन हिर्डोशी चे ग्रामसेवक अनिल अभंग यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

तसेच रात्रीच्या वेळेस शाळेचे शिपाई यांनी मुक्कामी थांबण्याची गरज असल्याचे देखील शिक्षक वर्गा कडून सांगण्यात येत आहे. अज्ञात व्यक्ती विरुद्ध भोर पोलीस स्टेशन ला दरवाज्याचे नुकसान केले बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर अज्ञात व्यक्तीचा शोध चालू आहे.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page