- Advertisement -spot_img
Homeक्राईमलोणीकंद पोलीसांनी गावठी हातभट्टी केली उध्वस्त

लोणीकंद पोलीसांनी गावठी हातभट्टी केली उध्वस्त

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भावडी, ता. हवेली येथील हांडगर वस्ती येथे इंद्रायणी नदीच्या पात्रात सुरू असलेल्या गावठी हातभट्टीवर छापा टाकत ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करत दोघा इसमांवर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (फ) (ब) (क). ८३ प्रमाणे अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
ग्रामीण भागामध्ये गावठी हातभट्टी दारुचे अवैध धंदे चालु असल्याच्या तक्रारी नागरिकांकडुन पोलीसांना प्राप्त झाल्या होत्या. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे रंजनकुमार शर्मा व पोलीस उपआयुक्त परिमंडळ ४. पुणे शहर शशीकांत बोराटे यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईगंडे यांनी पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांचे नेतृत्वाखाली सपोनि रवींद्र गोडसे व एक पथक तयार त्यांना योग्य ते निर्देश देउन मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने रवाना केले होते.
त्यानुसार सपोनि रवींद्र गोडसे व त्यांच्या पथकाने वाहने एका विशिष्ट अंतरावर लावुन तेथुन सुमारे २ किमी पायी जावुन भावडी गावच्या हद्दीत हांडगर वस्तीजवळ इंद्रायणी नदीच्या पात्रामध्ये लावलेल्या एका हातभट्टीच्या धंद्यावर प्रभावी छापा टाकला. त्यामध्ये त्यांनी ७० लिटर दारू जप्त करुन, १५०० लिटर रसायन, त्याशिवाय दारु गाळण्याचे लोखंडी बॅरल अॅल्युमिनिअमचा पाईप इ साहित्य, एकुण ८६,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल जागीच ताब्यात घेवून नष्ट केला.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर रंजनकुमार शर्मा, पोलीस उपआयुक्त परिमंडळ ४, पुणे शहर शशीकांत बोराटे, सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग, पुणे शहर संजय पाटील यांचे मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणीकंद विश्वजीत काइंगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मारुती पाटील, तपास पथकाचे सपोनि रविंद्र गोडसे, पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे, पोलीस नाईक सागर जगताप, पोलीस शिपाई पांडुरंग माने, आशिष लोहार, मल्हारी सपुरे लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर यांनी केली आहे.
गुन्हयाचा पुढील तपास सपोनि रविंद्र गोडसे हे करीत आहेत.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page