लोणीकंद प्रतिनिधी : पोपट मांजरे
वढू खुर्द, ता. हवेली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते व पोलीस मित्र प्रवीण ढवळे यांची निवड करण्यात आली.
त्यावेळी सरपंच रसिका चोंधें, माजी सरपंच मोहिनी भोंडवे, अनिल चोंधें, सा. कार्यकर्ते सचिन भोंडवे, उपसरपंच नवनाथ पवळे, सदस्य महेंद्र खांदवे, नंदकुमार डोके, मंगेश भंडारे, खंडू गोलांडे, शाळेचे मुख्याध्यापक पवार, वनवे, गायकवाड आदी मान्यवर व शिक्षक उपस्थित होते. निवडीनंतर ग्रामस्थांच्या वतीने प्रवीण ढवळे यांचा पुष्पहार देऊन सत्कार करत अभिनंदन करण्यात आले.

शाळेची गुणवत्ता, शिक्षणाचा दर्जा, आरोग्य, पिण्याचे शुद्ध पाणी, इमारती बाबत काही अडचणी व इतर सुविधा देण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रवीण ढवळे यांनी “आपली लोकशाही” शी बोलताना सांगितले.





