- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणहिर्डोशी -धामणदेव वाडी येथे आषाढी एकादशी कार्यक्रम उत्साहात साजरा

हिर्डोशी -धामणदेव वाडी येथे आषाढी एकादशी कार्यक्रम उत्साहात साजरा

- Advertisement -spot_img

हिरडस मावळ प्रतिनिधी : दिपक पारठे
आषाढी एकादशी निमित्त मौजे हिर्डोशी – धामणदेव वाडी येथे विठ्ठल रुख्मिणी मंदिरात भव्य दिव्य असा उत्सव साजरा करण्यात आला. सकाळी अभिषेक, महाआरती, व फराळ वाटप करण्यात आल्या नंतर दुपारी सुस्वर संगीत भजन झाले. विठुरायाच्या गजरात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.


तसेच सायंकाळी झी टॉकीज फेम संस्थापक ह. भ. प. राहुल महाराज पारठे यांनी स्थापन केलेल्या अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था आपटी येथील लहान मुलांचा हरिपाठ झाला आणि रात्री याच संस्थेत शिकत असणारा संस्थेतील विद्यार्थी कुमार ढवळे यांचे सुश्राव्य असे हरिकीर्तन झाले व रात्री सुस्वर संगीत भजनाचा देखील कार्यक्रम पार पडला.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

अशा प्रकारे कार्यक्रम साजरा करण्याचे हे चौथे वर्ष असून दरवर्षी नित्य नियमाने आषाढी एकादशीचा कार्यक्रम हिर्डोशी – धामणदेव वाडी येथे साजरा होत असतो. या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ व महिलावर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page