गजानन गव्हाणे पाटील
लोणीकंद, ता. हवेली ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी नुकतीच राहुल बाबासाहेब शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विद्यमान उपसरपंच ओंकार कंद यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक घेण्यात आली. यावेळी राहुल शिंदे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची उपसरपंच पदी निवड झाली असल्याचे ग्रामसेवक बोरावणे यांनी जाहीर केले. निवडणुकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रियांका योगेश झुरुंगे या होत्या.
यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीपदादा कंद, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती नारायणराव कंद, उपसभापती रवींद्र कंद, ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार कंद, ओंकार कंद, सागर कंद, आशिष गायकवाड, गौरव झुरुंगे, सुधीर कंद, अतुल मगर, माजी सरपंच श्रीकांत कंद, अनिल होले, लक्ष्मीबाई कंद, सोमेश्वर पतसंस्थेचे संचालक शहाजी शिंदे, शालेय समितीचे अध्यक्ष विजय कंद, माजी अध्यक्ष जयआप्पा कंद, भाजपा उद्योग आघाडी हवेली तालुकाध्यक्ष संतोष झुरुंगे, रवींद्र जगताप, शेखर शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ग्रामस्थांचे वतीने राहुल शिंदे यांचा पुष्पहार घालून अभिनंदन करण्यात आले. तर गावात जलजीवन च्या माध्यमातून पिण्याचे शुद्ध पाणी, कचरा व्यवस्थापन तसेच गावचा वाड्या वस्त्यांवर चांगले व दर्जेदार रस्ते बांधण्यासाठी ग्रामपंचायत च्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित उपसरपंच राहुल शिंदे यांनी “आपली लोकशाही” शी बोलताना सांगितले.





