- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणमहावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे पाळीव म्हसीला ला विजेचा धक्का

महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे पाळीव म्हसीला ला विजेचा धक्का

- Advertisement -spot_img

हिरडस मावळ प्रतिनिधी : दिपक पारठे
भोर तालुक्यातील कारी येथील दत्तात्रय सोनबा कुडले या शेतकऱ्याच्या पाळीव म्हैस ला महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे विजेचा शॉक लागला असून ही घटना दि.२८ रोजी दुपारी साडे चार ते पाच च्या दरम्यान घडली आहे.
दत्तात्रय कुडले यांनी आपली पाळीव म्हैस चारण्यासाठी सोडली असताना ही घटना घडली असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही. गेली ३ ते ४ महिन्यापूर्वी खांबावरील तार तुटली होती परंतु ग्रामस्थांनी वारंवार तक्रार केली असताना महावितरणाने याच्या कडे दुर्लक्ष केले तसेच या गावाला वायरमन नसल्या मुळे अशी घटना वारंवार घडू शकते असे कारी येथील ग्रामस्थ राजेंद्र घोलप व शिवाजी सनस यांनी सांगितले
सदर घटनेचा पंचनामा निगुडघर चे पशुवैद्यकीय डॉ. एस. व्ही. निकम यांनी केला असून म्हसीच्या मागच्या बाजूला विजेचा शॉक लागला असल्याचे निदर्शनास आले असून प्राथमिक औषधोपचार केला असून पुढे सुद्धा करीत राहू असे डॉ एस.व्ही. निकम यांनी सांगितले..
विजेचा शॉक लागल्यामुळे म्हसीला उभे राहण्यास त्रास होत असून दगावण्याची शक्यता आहे. तसेच महावितरणाने लवकरात लवकर तुटलेल्या तार,वायर ची दुरुस्ती करावी अन्यथा अजून दुर्घटना होवू शकते असे दत्तात्रय कुडले यांनी सांगितले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page