गजानन गव्हाणे पाटील
हातामध्ये भगवे झेंडे घेत, हरिनामाचा गजर करत ” ज्ञानोबा माऊली तुकाराम ” माऊली माऊली च्या जयघोषात ज्ञानांकुर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सनराईज इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये भव्य दिंडी व पालखी सोहळ्याचे पारंपरिक पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने कोरेगाव भीमा मध्ये काढण्यात आलेल्या पालखी सोहळ्यात तब्बल ६०० विद्यार्थी, पालक व शिक्षक ही सहभागी झाले होते.
यावेळी पालखी चे पूजन संस्थेने अध्यक्ष भगवान भंडारे यांचे हस्ते करण्यात आले. तर उपाध्यक्षा मोहिनी फडतरे, सचिव ज्योती फडतरे, उद्योजक व माजी चेअरमन संजय फडतरे, ज्ञानेश्वर भंडारे, सचिन भंडारे, मोनिका भंडारे, शारदा भंडारे, शहाजी फडतरे, आनंदा फडतरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.

पालखी सोहळ्याचे नियोजन व व्यवस्थापन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतीक्षा लंघे – घुटे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती शिंदे, अनिता झावरे, शिल्पा मेस्त्री, निर्मला मुरकुटे, शीतल ताठे, गीता ढगे, अश्विनी उन्हाळे, मिलिंद गायकवाड, रोहिणी शिंदे, वंदनाकुमारी, सुजाता गवळी, मनीषा वाघमारे, संगीता पारखे, सुप्रिया चौधरी, सुवर्णा देशपांडे, सागर वाणी, तनुश्री नायक आदींनी केले.





