गजानन गव्हाणे पाटील
” ज्ञानोबा माऊली तुकाराम ” माऊली माऊली च्या जयघोषात वढू खुर्द, ता. हवेली येथील अंगणवाडीतील चिमुकल्यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने भव्य असा पालखी सोहळा काढला यावेळी असंख्य विद्यार्थी व पालक ही या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते.
या अंगणवाडीत वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. तसेच मुलांना आपली संस्कृती व महाराष्ट्राची पालखी सोहळा कसा असतो याची माहिती देण्यासाठी उपक्रम राबविण्यात आला असल्याचे “आपली लोकशाही” शी बोलताना अंगणवाडी सेविका आशा पातोंड यांनी सांगितले.
या पालखी सोहळ्यात विहांत पवळे, विनायक घानोकार, अर्णव दरेकर हे विठ्ठल तर पूर्वा दौंडकर, अनन्या दगडे, श्रीशा भंडारे, राजश्री कोळी या रुक्मिणीच्या वेशात पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी अंगणवाडी पासून संपूर्ण गावात पालखी सोहळा काढण्यात आला. तर विठ्ठल मंदिरात पूजा करण्यात आली.
-

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp या संपूर्ण सोहळ्याचे नियोजन आशा पातोंड व मदतनीस नंदिनी निळेकर यांनी केले. तर सर्वात शेवटी अभंग म्हणत मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.





