गजानन गव्हाणे पाटील
फुलगाव, ता. हवेली येथे लोकसेवा शैक्षणिक संकुल आणि डायनापॅक प्रा.लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच लोकसेवा शैक्षणिक संकुलात वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेतली.
जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी झाडा-झुडपांशिवाय सकल सजीव सृष्टीला पर्याय नाही. ‘वृक्ष वल्ली आम्हां सोयरी वनचरे ‘ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगवाणी प्रमाणे वृक्ष हेच आपले सगे सोयरे आहेत, हा मूलमंत्र जपत टर्किश, जर्मनी, ब्राझील, डच, फ्रेंच, नेदरलँड आणि डेन्मार्क अशा सात देशातील पाहुण्यांच्या व लोकसेवा शैक्षणिक संकुलातील पदाधिकारी व डायनापॅक कंपनीचे व्यवस्थापकीय अधिकारी आधिकरी यांच्या शुभ हस्ते लोकसेवा शैक्षणिक संकुलाच्या भव्य मैदानात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ‘प्लास्टिक मुक्त भारत ‘ असाही संकल्प करण्यात आला.
या प्रसंगी विदेशी पाहुणे जॅन क्लॉस टोबियास, अहमद सिम्सिट, क्रिस्टोफ थिसब्रुमेल, फेलिप लकोव, फॅबिओ कॅव्हालो, सोंजा बॉटचर, सेबी जोसेफ, बेनोइट मॉन्टेनॉट, थिबेरियो टॅनस, मॅड्स फिस्कर, बास रोटियर, टिम आयस्फेल्ड, मॉरिझिओ जिआन्सिरकुसा, नील जेकबसन, फ्लॅव्हियो गॅबोसी, सारा लिसेनफेल्ड, विश्वेश राय, उपस्थित होते.

याप्रसंगी नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचे प्राचार्य अमर क्षीरसागर, उपप्राचार्य विकास तीरखुंडे, डायनॅपॅकचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित सोम, डायनॅपॅक निती आनंद व्यवस्थापक एचआर, सैनिकी शाळेचे प्रशासकीय अधिकारी पांडुरंग जगताप, प्रा. सोमनाथ आवचार तसेच शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





