- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ध्रुव प्रतिष्ठान कडून शैक्षणिक साहित्य व शिष्यवृत्ती वाटप

दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ध्रुव प्रतिष्ठान कडून शैक्षणिक साहित्य व शिष्यवृत्ती वाटप

- Advertisement -spot_img

हिरडस मावळ प्रतिनिधी : दिपक पारठे
भोर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यामध्ये दुर्गम भागामध्ये रायरेश्वरच्या पायथ्याला वसलेल्या टिटेघर येथील ध्रुव प्रतिष्ठानच्या वतीने हिर्डोशी खोरे व आंबवडे खोऱ्यातील ८६७ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
दप्तर, फुलस्केपवही,पेन, कंपास,लागणारे सर्व दर्जेदार साहित्य कीटचे वाटप व उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती वाटप कार्यक्रम टिटेघर येथे कै. अण्णासाहेब पाटील सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आला होता.
ध्रुव प्रतिष्ठानच्या वतीने गेले २२ वर्षापासून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी विविध योजना चालू आहेत. यामध्ये शैक्षणिक मदत, शैक्षणिक पालक योजना, राजमाता जिजाऊ कन्या शैक्षणिक साहित्य योजना याद्वारे गरीब विद्यार्थिनींना, उच्च शिक्षण,विविध कौशल्यप्रशिक्षण, संगणक प्रशिक्षण, यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. इतर शाळांमधून विद्यार्थ्यांची फाटके दप्तर बदलून दिली जातात. तसेच तालुक्यातील विसगाव खोरे, पसुरे खोरे या दुर्गम भागातील गरीब, व गरजू विद्यार्थ्यांनाही साहित्य वाटप होणार आहे.
या उपक्रमासाठी टेक्नो फोर इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड, कमिन्स इंडिया फाउंडेशन, आरती आणावकर यांनी मदत केली आहे. अशी माहिती संस्थापक अध्यक्ष राजीव केळकर यांनी “आपली लोकशाही” शी बोलताना दिली.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

या कार्यक्रमासाठी हिर्डोशी व अंबवडे खोऱ्यातील विद्यार्थी,पालक, शिक्षक, नागरिक, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर सुरेश गोरेगावकर, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय जाधव, प्राध्यापक डॉक्टर रोहिदास जाधव, भोर तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष सुदामराव ओंबळे, शिक्षक सोसायटीचे संचालक पंडितराव गोळे, केंद्रप्रमुख अंजना वाडकर, मुख्याध्यापिका स्नेहल देशमाने,उपसरपंच माणिक नवघणे, तंटामुक्ती अध्यक्ष आनंदराव नवघणे, माजी सरपंच सोनबा दळवी राजमाता जिजाऊ क्लबच्या सर्व कार्यकर्त्या, गावातील तरुण मंडळाचे कार्यकर्ते, तसेच राहुल नवघणे, विजय वाडकर,राहुल खोपडे, योगीराज केळकर, शेखर भडाळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन संतोष दळवी सर यांनी केले. तर आभार निलेश भोईटे यांनी मानले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page