- Advertisement -spot_img
Homeक्राईमपेरणे येथील दारुभट्टी उध्वस्त गुन्हे शाखा यूनिट-६ ची कारवाई

पेरणे येथील दारुभट्टी उध्वस्त गुन्हे शाखा यूनिट-६ ची कारवाई

- Advertisement -spot_img

पुणे : प्रतिनिधी
हवेली तालुक्यातील पेरणे-डोंगरगाव रोडवर ओढ्यालगत मौलाई चौक येथे गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या दारू भट्टीवर कारवाई करून उध्वस्त करण्यात आली आहे. गुन्हे शाखा युनिट ६ ने केलेल्या या कारवाईदरम्यान गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य नष्ट करण्यात आले.
हातभट्टीची दारू तयार करणारी महिला निलम बजरंग परदेशी (वय २९) हीला ताब्यात घेऊन महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (फ)(ब)(क)(ड) प्रमाणे लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई मध्ये एकूण ३०० लीटर गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन व ३५ लिटर मापाचे एकूण ५ कॅनमधे एकूण १७५ लीटर गावठी हातभट्टीची तयार दारू असा एकूण २२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त सतीश गोवेकर मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल, पोना रमेश मेमाने, पोलीस अंमलदार ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, सचिन पवार, ज्योती काळे पथकाने केली आहे.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page