- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणमांजरी खुर्द ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी भाजपाच्या किर्ती माऊली उंद्रे पाटील यांची बिनविरोध...

मांजरी खुर्द ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी भाजपाच्या किर्ती माऊली उंद्रे पाटील यांची बिनविरोध निवड

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी नुकतीच कीर्ती माऊली उंद्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विद्यमान उपसरपंच रेखा शंकर पवार यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी सरपंच सीताराम उंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक घेण्यात आली. यावेळी कीर्ती उंद्रे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली असल्याचे ग्रामविकास अधिकारी उगले यांनी जाहीर केले.


यावेळी माजी सभापती रोहीदासशेठ उंद्रे पाटील, माजी सरपंच विलास आबा उंद्रे, महादेव तात्या उंद्रे, उद्योजक विकासशेठ उंद्रे, शिवाजी नाना उंद्रे, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक वसंत भाऊ उंद्रे, चेअरमन रमेश आप्पा उंद्रे, पीएमआरडीएचे सदस्य स्वप्नील उंद्रे, निखिल उंद्रे, चेअरमन माऊली तात्या साळुंके, माजी उसरपंच हिरामण गवळी, विलास भाऊ उंद्रे, मधुकर उंद्रे, सतिश आव्हाळे, रघुनाथ दादा उंद्रे, उपसरपंच रेखा पवार, प्रतिक भोसले, ग्रामपंचायत सदस्य अभिजीत उंद्रे, सागर उंद्रे, भाऊसाहेब माने, रुपेश उंद्रे, मनिषा ढेरे, सिमा सावंत, वैशाली काकडे, जयश्री हंकारे, तंटामुक्ती अध्यक्ष रामदास बांगर, दत्तात्रय म्हस्के, माजी उपसरपंच गौतम भोसले, ऍड. अमोल भोरडे, बाळासाहेब पवार, महेश पवार, भाजपा वडगाव शेरी सरचिटणीस माऊली उंद्रे, चेअरमन दिपक उंद्रे, संदीप उंद्रे, अमोल उंद्रे, शेखर साळुंके, मुन्ना उंद्रे, पांडुरंग उंद्रे, किशोर आव्हाळे, अमित आव्हाळे, मयुर पवार, धर्मेंद्र मोरे, शैलेश ढेरे, पप्पु शिनगारे, गणेश कड, योगेश उंद्रे, रविंद्र उंद्रे, प्रतिक उंद्रे, चैतन्य उंद्रे आदी उपस्थित होते.


यावेळी कीर्ती उंद्रे यांची उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल गावातून गुलालाची उधळण करत एकमेकांना पेढे भरवत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

याप्रसंगी बोलताना नवनिर्वाचित उपसरपंच कीर्ती माऊली उंद्रे यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच महिला व मुलींना स्वतः पायावर उभे राहण्यासाठी विविध प्रकारच्या व्यावसायिक मार्गदर्शन कार्यशाळा तसेच महिला बचत गटांचे मेळावे भविष्यात राबविण्यात येणार असल्याचे आपली लोकशाही शी बोलताना सांगितले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page