- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणसणसवाडीच्या सरपंचपदी सुवर्णा रामदास दरेकर बिनविरोध

सणसवाडीच्या सरपंचपदी सुवर्णा रामदास दरेकर बिनविरोध

- Advertisement -spot_img

सणसवाडी प्रतिनीधी : प्रमोद कुतवळ
जिल्ह्यामध्ये अग्रेसर अशा सणसवाडी ता. शिरूर येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी सुवर्णा रामदास दरेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी विकास फुके व ग्रामविकास अधिकारी बाळनाथ पवने यांनी जाहीर केले.


सरपंच संगीता नवनाथ हरगुडे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी निवड झाल्याने गावातून भैरवनाथ मंदिरापर्यत झांजपथक वाजंत्री बेन्जो पथकाच्या निनादात गुलालाची उधळण करत भव्य अशी मिरवणुक काढून मंदिरामधे अभिनंदन करण्यासाठी सभा झाली.


यावेळी सरपंच परिषदेच्या जिल्हाध्यक्षा सुवर्णा दरेकर, माजी सरपंच संगिता हरगुडे व ग्रामस्थांच्या हस्ते नवोदीत सरपंच सुवर्णा दरेकर यांचा सत्कार करणेत आला. यावेळी पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडीत दरेकर, सभापती मोनिका हरगुडे, माजी उपसभापती आनंदराव हरगुडे, उपसरपंच दत्ताभाऊ हरगुडे, माजी सरपंच दता हरगुडे, नवनाथ दरेकर, माजी उपसरपंच युवराज दरेकर, सागर दरेकर, विजयराज दरेकर, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष वैभव यादव, दगडू दरेकर, राजेश भुजबळ, रमेश सातपुते, माजी उपसरपंच बाबासो दरेकर, अक्षय कानडे, स्नेहल भुजबळ, रुपाली दरेकर, ललिता दरेकर, सुवर्ण दरेकर, ग्रामविकास अधिकारी बी एच पवणे, माजी उपसरपंच सुनिता दरेकर, संभाजी साठे, चेअरमन काळुराम दरेकर, गोरख भुजबळ, अनिल दरेकर, सुहास दरेकर, रामभाऊ दरेकर, रामदास दरेकर, प्रशांत दरेकर, सुखदेव दरेकर, अश्विनी दरेकर, श्रीधर दरेकर, आदिनाथ हरगुडे, काळुराम हरगुडे, काळुराम दरेकर, युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

सणसवाडीच्या विकासासाठी व नागरीकांचे प्रश्न समस्या सोडविण्यासाठी सतत प्रयत्नरत राहीन, त्याच बरोबर केंद्र व राज्य सरकारच्या योजना तळागाळात पोच असे सुवर्णा दरेकर यांनी सांगीतले. पती रामदास दरेकर यांचे नेतृत्व, वक्तृत्व, कर्तुत्व याचा उपयोग करून नक्कीच विकास कामांचा विक्रम करीन असा विश्वासही नवनिर्वाचित सरपंच सुवर्णा दरेकर यांनी आपली लोकशाही शी बोलताना त्यांनी व्यक्त केला.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page