गजानन गव्हाणे पाटील
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय मराठा महासंघ व सकल मराठा समाज पुणे कॅन्टोन्मेंट विभाग तसेच केअर टेकर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आरोरा टॉवर पुणे कॅम्प येथील पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठा महासंघ तसेच छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती तुळापुरच्या महिला अध्यक्ष श्रुतिका पाडळे, मराठा महासंघ कार्याध्यक्ष मिलन पवार, अखिल भारतीय मराठा महासंघ युवक उपाध्यक्ष पुणे कॅन्टोन्मेंट निखिल टेकवडे, सकल मराठा समाज पुणे कॅन्टोन्मेंट विभागाचे दिलीप भिकुले, शिवाजी शिंदे, ऋषिकेश पवार, रोहित मस्के, विजय महाडिक, निलेश कणसे, केअर टेकर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष कुमार शिंदे, विजय बेलीटकर सह आदी मान्यवर उपस्थित होते.





