गजानन गव्हाणे पाटील
जय भीम च्या जयघोषात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती आपटी, ता. शिरुर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रतिमा पूजन आपटी गावाच्या सरपंच सुनिता शिवले, माजी उपसरपंच रेणुका गाडेकर यांनी केले तसेल तेथे उपस्थित सर्व महिला आणि पुरुष वर्गाने दिपप्रज्वलंना करत बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी मुलांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील विविध प्रसंग आपल्या भाषणात व्यक्त केले.

यावेळी दीपिका भालेराव, अतुल मुरकुटे, शुभम शिवले, माजी सरपंच मुमताज पठाण, नालंदा बुद्ध विहार ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष साहिल भालेराव, सचिव सचिन भालेराव, खजिनदार सुहास भालेराव, कार्याध्यक्ष मनोज इंगळे, युवा उद्योजक प्रवीण गाडेकर, आदी गाडेकर तसेच आपटी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते. आलेल्या अनुयायांसाठी खीर वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक भवार व कपिल भवार यांनी केले तर भाऊदास भालेराव यांनी सर्वांचे आभार मानले.





