कोथरूड प्रतिनिधी : गणेश रहाटे
जय भीम च्या जयघोषात अखिल भारतीय छावा संघटना, कोथरूड यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी मोठ्या उत्साहात आणि सामाजिक उपक्रम राबवित साजरी करण्यात आली.
भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन काँग्रेस कमिटी अध्यक्ष कोथरूड विजय खळदकर, दत्तात्रय चौधरी, नगरसेवक पुणे मनपा सुशील मेंगडे तसेच अखिल भारतीय छावा संघटना वाहतूक जिल्हा अध्यक्ष गौतम वाव्हळे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हा अध्यक्ष बिट्टू पाटील, उपाध्यक्ष अशोक थोरात, कार्याध्यक्ष अजित जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष किशोर कांबळे, पांडुरंग ढवारे, प्रदीप बिराजदार, विनोद सुतार, विशाल अभंगे आदी मान्यवर व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.





