गजानन गव्हाणे पाटील
शिरूर तालुक्याला अखेर कायमस्वरूपी तहसीलदार मिळाले असून बाळासाहेब म्हस्के यांची अखेर शिरूर तहसीलदार पदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून शिरूर तालुक्याचे तहसीलदार पद हे रिक्त होते. कायमस्वरूपी तहसीलदार मिळावे याबाबत नागरिकांची मागणी होती.
तर प्रभारी तहसीलदार म्हणून बालाजी सोमवंशी हे काम पाहत होते. दरम्यान नुकतेच राज्य शासनाकडून बदलीचे आदेश निघाले असून नागपूर रामटेक येथील तहसीलदार बाळासाहेब दादासाहेब म्हस्के यांची शिरूर येथे रिक्त पदावर बदली करण्यात आली आहे. या बदली आदेशामुळे शिरूर येथे कायमस्वरूपी तहसीलदार मिळाले आहे.

शिरूर तालुक्यात असलेली पंचतारांकित औद्यगिक वसाहत, नव्याने करडे येथे सुरू असलेल्या एमआयडीसी प्रकल्पाचे काम, तालुक्यात जमिनीचे आलेले सोन्याचे भाव यामुळे वाढलेली जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार देखील वाढले असून सर्वसामान्य नागरिकांची कामे गेल्या काही दिवसांपासून खोळंबली आहेत.





