गजानन गव्हाणे पाटील
अखिल भारतीय मराठा महासंघ महिला आघाडी पुणे शहर तसेच छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती तुळापुर यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले, मा. सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने स्मारकास पुष्पहार व विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब आमराळे, पुणे शहर महिला अध्यक्ष श्रुतिका पाडळे, पुणे शहर उपाध्यक्ष कामिनी मेमाणे, कसबा अध्यक्ष अश्विनी शिंदे, महिला कायदा समिती वर्षा धुमाळ, तुळापुर प्रदेशाध्यक्ष आरती भोगाडे, अखिल पुणे शहर सरचिटणीस गणेश मापारी, पुणे शहर उपाध्यक्ष सुशिल पवार, युवक कार्याध्यक्ष राकेश गायकवाड व इतर पदाधिकारी उपस्थित होते.





