- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणकामगारांना अधिकाधिक लाभ व सुविधा देण्यासाठी कटिबद्ध : आमदार राहुल कुल

कामगारांना अधिकाधिक लाभ व सुविधा देण्यासाठी कटिबद्ध : आमदार राहुल कुल

- Advertisement -spot_img

शिवशाही महाराष्ट्र राज्य कामगार संघटना नामफलक अनावरण सोहळा
गजानन गव्हाणे पाटील
कंपनी व्यवस्थापन व कामगार यांचा योग्य समतोल ठेवून त्या दृष्टीने काम करण्यात येईल व कामगारांच्या दृष्टीने आश्वासक पावले टाकून त्यांना अधिकाधिक लाभ व सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मत आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केले.
तळेगाव ढमढेरे – सणसवाडी रोडवरील एल अँड टी फाटा येथील नियोसिम इंडस्ट्री कंपनीमध्ये भारतीय जनता पार्टी प्रणित भारतीय मजदूर संघ संलग्न शिवशाही महाराष्ट्र राज्य कामगार संघटना नामफलक अनावरण सोहळा आरोग्यदूत आमदार राहुल कुल यांच्या हस्ते झाला. यावेळी पीडीसीसी बँकेचे संचालक प्रदीप कंद, भाजपा तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे, भारतीय मजदूर संघ जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण, सरचिटणीस बाळासाहेब भुजबळ, सेवानिवृत्त तलाठी कैलास नरके, श्रीकांत ढमढेरे, संदीप ढमढेरे, भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कंपनी कामगार व्यवस्थापन तसेच सर्व कामगार व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.


पीडीसीसी बँकेचे संचालक प्रदीप कंद यांनी आपल्या मनोगतामध्ये संपूर्ण भारतीय जनता पार्टी कामगारांच्या पाठीशी उभी राहील अशी ग्वाही दिली. घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक ॲड. सुधीर ढमढेरे, कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे, सचिव राजेंद्र तकटे यांच्या मार्गदर्शनाखाली युनियनची स्थापना करण्यात आली आहे.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

या वेळी पोलीस उपअधीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बाळासाहेब भुजबळ यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी आभार मानले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page