गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भीमा, ता. शिरुर येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांची चैत्र वद्य सप्तमी व अष्टमी या तिथीला येणाऱ्या यात्रेची तळी श्री भैरवनाथ महाराजांच्या मंदिरात ग्रामस्थांच्या उपस्थिती मध्ये भरण्यात आली. यावेळी घेण्यात येणाऱ्या विविध धार्मिक व मनोरंजन कार्यक्रमावर चर्चा करण्यात आली.

१२ एप्रिल व १३ एप्रिल रोजी यात्रा भरविण्यात येणार असून यात्रेच्या पहिल्या दिवशी श्री भैरवनाथ महाराजांची भीमा नदीच्या पाण्यात स्नान करून महाभिषेक करण्यात येणार आहे. तसेच पारंपरिक पद्धतीने वाद्यांच्या निनादात ग्रामप्रदीक्षिणा घालण्यात येणार आहे. तर मंदिरात भजन, छबिना तर रात्री ढोल लेझीम चे खेळांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच यात्रेच्या दुसऱ्या कुस्ती व मनोरंजनाचे कार्यक्रम होणार असल्याची प्राथमिक चर्चा यावेळी करण्यात आली.

यावेळी माजी सरपंच विठ्ठलराव ढेरंगे, बाळासाहेब फडतरे, सरपंच विक्रम गव्हाणे, खरेदी विक्री संघाचे संचालक अशोक काका गव्हाणे, तंटामुक्ती चे अध्यक्ष दिनकर गव्हाणे, माजी अध्यक्ष संजय फडतरे, माजी उपसरपंच अरविंद गव्हाणे, दत्तात्रय ढेरंगे, सत्यनारायण ढेरंगे, ग्रामपंचायत सदस्य केशव फडतरे, पांडुरंग ढेरंगे, तुळशीराम फडतरे, शिवाजीराव ढेरंगे, बजरंग घावटे, महादेव फडतरे, सचिन ढेरंगे, बापूसाहेब शिंदे, आनंदा फडतरे, प्रकाश गव्हाणे, दत्तात्रय ढेरंगे, सोमनाथ मांझीरे, निखिल सुपेकर, ज्ञानेश्वर फडतरे, गोपीनाथ ढेरंगे आदी यावेळी उपस्थित होते.





