गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भीमा, ता. शिरुर येथील प्रभाग क्रमांक 2 मधील चेंबर चे झाकण मागील काही दिवसांपासून नादुरुस्त झाले असल्याने या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला किव्वा लहान मुलाला गंभीर स्वरूपाची दुखापत होण्याची शक्यता असून ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ या चेंबर ची डागडुजी करावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

सध्या कोरेगाव भीमा ग्रामपंचायत चे सरपंच पद प्रभाग क्रमांक 2 मध्ये आले असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात स्वच्छता व भिशी पावडर टाकण्यात येते. यामुळे डासांची संख्या कमी आहे. परंतु भिशी पावडर टाकताना या चेंबर कडे कोणाचे ही लक्ष जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यातच या प्रभाग क्रमांक दोन मधील लोकप्रतिनिधी याच चेंबर पासून हाकेच्या अंतरावर राहत असल्याने सदर झाकण दुरुस्त कधी होणार याकडे या प्रभागातील लोकांचे लक्ष लागून राहिले आहे.





