गजानन गव्हाणे पाटील
श्री क्षेत्र वढू बुद्रुक, ता. शिरूर येथे धर्मवीर बलिदान मास निमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने सार्वत्रिक मुंडन आणि रक्तदान शिबिर संपन्न झाले. यावेळी असंख्य शंभू भक्तांनी सहभाग घेतला तर तब्बल २१४२ बाटल्या रक्त संकलित झाले विशेष म्हणजे महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरात सहभागी घेत रक्तदान केले.

धर्मवीर शंभूराजांना पकडल्यानंतर त्यांचे 40 दिवस हाल हाल केले, शिक्षेचा प्रत्येक दिवस असह्य असताना शंभूराजे आणि कवी कलश यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, हेच ते 40 दिवस वढू बुद्रुक – तुळापूर यांचे बरोबर राज्य तसेच हिंदुस्तान मध्ये बलिदान मास शिवभक्त व शंभू भक्तांच्या वतीने पाळण्यात येतो. बलिदान मास निमित्त दर वर्षी रक्तदान शिबिर राबविण्यात येते. रक्त संकलित करण्यासाठी पी. एस. आय पुणे व अक्षय रक्तपेढी पुणे यांच्या प्रत्येकी 2 शाखा यांनी काम पाहिले, रक्तदात्यांसाठी अल्पोपआहाराची व पाण्याची सोय करण्यात आली होती.
सकाळी ९ वाजता सुरू झालेला रक्तादान शिबीर रात्री १०.१५ वाजता संपले. शंभू भक्तांचा हा उत्साह पाहून पंचक्रोशीत कौतुक होत आहे.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यावतीने रक्तदात्यांना मोठी शंभू प्रतिमा, रक्तदान प्रमाणपत्र भेट म्हणून देण्यात आले.





