सरपंच विक्रम गव्हाणे यांची माहिती.
गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भीमा, ता.शिरूर येथील पंढरीनाथ नगर वस्ती मधील ग्रामस्थांना मागील अनेक दिवसांपासून वायू प्रदूषणाच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
पंढरीनाथ नगर येथील वाडा पुनर्वसन या मुख्य रस्त्याच्या बाजूने काही कचरा व्यावसायिक स्थायिक आहेत. दररोज सायंकाळी अंधाराचा फायदा घेत जवळील कचरा रस्त्याच्या बाजूनेच पेटवून देतात परिणामी या प्लास्टिक कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात धुराचे लोट हवेत पसरत असून रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका ठरत आहे.

तर लहान मुले या दूषित धुरामुळे आजारी पडू लागले आहेत.अनेकांना डोळ्यांचे व श्वसनाचे आजार जडण्याची दाट शक्यता आहे. सायंकाळच्या वेळी या रस्त्याने प्रवास करणे देखील आता नाकिनऊ झाले आहे.
या बाबत आम्ही तक्रारी केल्या असून देखील कुठल्याही प्रकारची खबरदारी सदर व्यावसायिक घेत नसल्याचे आरोप येथील ग्रामस्थ करत आहेत. या व्यावसायिकांना कोणाचा हातभार तर नसेल ना असा प्रश्न देखील ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे. या समस्येबाबत कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीने लवकरात लवकर दखल घ्यावी अशी मागणी आता पंढरी नाथ नगर येथील ग्रामस्थ करत आहेत.

वायू प्रदूषण समस्ये बाबत लवकरात लवकर दखल घेतली जाणार असून यामध्ये जे दोषी आढळून येतील त्यांच्यावर ग्रामपंचायत व पोलिस प्रशासन मार्फत लवकरच कारवाई केली जाणार आहे. : सरपंच विक्रम गव्हाणे, कोरेगाव भीमा.





