गजानन गव्हाणे पाटील
हवेली तालुक्यातील वाडे बोल्हाई प्राथमिक आरोग्य केंद्रात जागरूक पालक सदृढ बालक मोहिमे अंतर्गत करण्यात आलेल्या कामाचा आढावा नुकताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले यांनी घेऊन ६७ टक्के काम पूर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत संदर्भ सेवा सुरू करून फॉलो अप घेण्याच्या सूचना संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
जागरूक पालक सदृढ बालक मोहिमेअंतर्गत ० ते १८ वयोगटातील सर्व मुले-मुली यांची शाळेत जाऊन आरोग्य तपासणी होणार आहे. गंभीर आजारी असणाऱ्या मुलांना संदर्भित सेवा तसेच मोफत उपचार व गरज पडल्यास शस्त्रक्रिया केल्या जातील. भेटीदरम्यान वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे द ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. बी. जोशी, डॉ. नागसेन लोखंडे, डॉ. हरेश लोहार, डॉ. करुणा साळवे, डॉ. प्रियांका सातव – कोलते, आरोग्य सहाय्यक बी जे मारणे, अनुसया लांडगे, श्रीराम घ्यार, धनंजय घाटे, उमाकांत सुर्यवंशी, रश्मी गावडे, मनीषा गुरव, दयानंद वाघमारे आदी यावेळी उपस्थित होते.






