गजानन गव्हाणे पाटील
वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत केसनंद उपकेंद्र येथील ज्ञानांकुर इंग्लिश स्कूल येथे सुरु असलेल्या जागरूक पालक सदृढ बालक मोहिमे अंतर्गत सनियंत्रण व देखरेखसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले यांनी गुरुवारी (दि.२३) भेट देऊन मोहिमेविषयी सविस्तर माहिती दिली. पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारीही यावेळी उपस्थित होते.

जागरूक पालक सदृढ बालक मोहिमेअंतर्गत ० ते १८ वयोगटातील सर्व मुले-मुली यांची शाळेत जाऊन आरोग्य तपासणी होणार आहे. गंभीर आजारी असणाऱ्या मुलांना संदर्भित सेवा तसेच मोफत उपचार व गरज पडल्यास शस्त्रक्रिया केल्या जातील. भेटीदरम्यान वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नागसेन लोखंडे व त्यांचे पथक केसनंद ग्रामस्थ उपस्थित होते.






