गजानन गव्हाणे पाटील
हडपसर पुणे येथे भारत एकता मिशन (भिम आर्मी) संस्थापक अध्यक्ष भाई चंद्रशेखर आझाद (रावण), राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनयसिंग रतन यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष सिताराम भाऊ गंगावणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष संदिप शेलार यांच्या नेतृत्वाखाली हडपसर पुणे येथे भारत एकता मिशन (भिम आर्मी) आरंभ कार्यक्रम पार पडला.
महानंदा कासले यांनी ठेवलेल्या न्यु होम मिनिस्टर कार्यक्रमामुळे या शाखेला विशेष महत्त्व प्राप्त झाले. या ठिकाणी सिताराम भाऊ गंगावणे यांनी आपल्या जाहिर भाषणातील ठळक मुददयांनी सगळ्यांची मने जिंकली. महाराष्ट्रभर शाखा बांधणीचा झंझावात सुरू असल्याने त्याचा फायदा सर्वसामान्य, गोरगरीब, शेतकरी, कामगार, विद्यार्थी हितासाठी चळवळ उभी करण्यासाठी होत असुन भिम आर्मी कोणत्याही जाती धर्माचा द्वेष न करता स्त्री व पुरुष या दोन जातीवर आधारित मानवतेच काम करणारी संघटना आहे. आगामी काळात भिम आर्मी महाराष्ट्र भर अग्रेसर राहून प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे असा विश्वास व्यक्त करण्यात आला असुन प्रत्येक वंचित, पिडीत व अन्याय सहन करणारा भिम आर्मीत सहभागी होऊन संविधानिक पध्दतीने न्याय मिळवून राज्याला यशाच्या शिखरावर नेण्यास मदत करेल असे सिताराम भाऊ गंगावणे यांनी सांगितले. यापुढे संघटना न थांबता रात्रंदिवस एक करत सर्वसामान्य माणसाला प्रामाणिक पणे न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे जाहीर केले.

यावेळी महाराष्ट्रातील अनेक भागातुन कार्यकत्यांनी हजेरी लावल्याचे दिसून आले. यात धुळे जिल्हा अध्यक्ष संजय चव्हाण, अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष शामभाऊ जाधव, भ्रष्टाचार जन आक्रोश समितीचे कार्याध्यक्ष योगेश कुलथे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश ऊबाळे, पुणे जिल्हा सचिव महानंदा कासले, मुळशी भोर वेल्हा वरिष्ठ अध्यक्ष महेंद्र साळुंखे,भोर महिला आघाडीच्या अध्यक्षा निलम जगताप, पुणे शहराध्यक्ष महादु खळगे, श्रीगोंदा महिला आघाडीच्या अध्यक्षा कविता चिकलठाणे, रविंद्र कांबळे, डॉ. शंकर यादव, प्रशांत भालेराव, महेंद्र रणखांबे, अजय रणखांबे, अंकुश माने,अक्षय अडसुळ, विनायक रणखांबे, निलेश चव्हाण, गणेश शेलार, प्रशांत माने, ओंकार ओंबळे,शिरुर तालुका उपाध्यक्ष सचिन साळवे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.






