- गजानन गव्हाणे पाटील
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या अंतर्गत पुणे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस महिलांनी विविध मागण्यांसाठी मागील तीन दिवसांपासून काम बंद आंदोलन पुकारले असून मागण्या मान्य होत तोवर जिल्हा व राज्य स्तरावर आंदोलन करणार असल्याचे यावेळी अंगणवाडी सेविकांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

अंगणवाडी कर्मचारी यांच्या मागण्याचे निवेदन पुणे जिल्हाअधिकारी, विभागीय उपाआयुक्त महिला व बालविकास विभाग तसेच जिल्हा कार्यक्रम अधिकारी पुणे यांना संपाचे निवेदन देण्यात आले.
अंगणवाडी सेविकांच्या मागण्या
♦️अंगणवाडी कर्मचारी यांना शासकीय सेवेत वर्ग करून पेन्शन लागू करा.
♦️केंद्र सरकारची मानधन वाढ दया.
♦️अंगणवाडी कर्मचारी यांना ग्रॅज्युटी लागू करा.
♦️आहारातील दरवाढ करून इंधन दर वाढवावे.
♦️अंगणवाडी कर्मचारी यांना आजारपणची रजा मंजूर करा
♦️मिनी अंगणवाडी केंद्राचे नियमित अंगणवाडी केंद्रात रूपांतर करावे.
♦️अंगणवाडी सेविकांना एवढेच मानधन मदतनीस यांना देण्यात यावे.
♦️पोषण ट्रकर मराठी करून दया
♦️नवीन मोबाईल तातडीने दया.

या मागण्या शासनाने तातडीने सोडवाव्यात अन्यथा २८ फेब्रुवारी रोजी मंत्रालय आझाद मैदान येथे विशाल मोर्चा काढण्यात येणार आहे.

लोणीकंद बीट च्या वतीने अंगणवाडी बिट प्रतिनिधी आशा पातोंड, उज्वला कंद, कमल वारघडे, वैशाली झुरुंगे, सुषमा कदम, लता गायकवाड, संगीता गजरे, ललिता धारणे, प्रज्ञा ढसाळ, पल्लवी वागस्कर, स्नेहा यनभर, मुक्ता कंद, शकुंतला शिवले, मदतनीस प्रमिला बर्वे, बिरदोडे, अर्चना कदम, बायडाबाई खराबे, सविता बनसोडे, अरुणा गायकवाड, मालन राऊत, सुवर्णा भगवान, छाया गाडुत्ते तर शिरुर तालुक्यातील प्रकल्प 1 रेश्मा रेडेकर, प्रकल्प 2 निर्मला चोभे, अध्यक्ष सीता मिसाळ, उपाध्यक्ष लहाणूबाई नरवडे, 12 बिटचे प्रतिनिधी अर्चना मिडगुले, रंजना चव्हाण, बिसमील्ला तांबोळी, मनीषा चौधरी, नंदा बत्ते, सुरेखा नवले,शोभा जठार, आदीका शिळीमकर, स्नेहा बोऱ्हाडे, मनीषा आत्रे, पद्मा गिलबिले आदींनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.





