- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणआम्ही मुस्लिम मावळे यांच्या वतीने शिक्रापूर येथे शिवजयंती उत्साहात साजरी

आम्ही मुस्लिम मावळे यांच्या वतीने शिक्रापूर येथे शिवजयंती उत्साहात साजरी

- Advertisement -spot_img

शिरुर प्रतिनिधी : शकील मणियार
रयतेचे राजे छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिना निमित्त आम्ही मुस्लिम मावळे छञपती शिवाजी महाराजांचे शिरूर तालुका आयोजित पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कासारी फाटा येथील गुरूकुल वस्तीग्रहामध्ये शिवजयंती मोठ्या आनंदाने साजरी करण्यात आली. छञपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा असलेल्या फोटोला प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व अनाथ, वंचित, गोरगरिब मुलांना मिठाईचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शिरूर तालुक्यातील व परिसरातील शिवभक्त व मुस्लिम मावळे मोठ्या संख्येंने उपस्थित होते.
छञपती शिवाजी महाराजांच्या सैन्यांमध्ये अनेक मुस्लिम मावळे होते. त्यांनी महाराजांसोबत प्रामाणिकपणे उल्लेखनीय काम केले होते, छञपती शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांमध्ये बहुसंख्य मुस्लिम होते. महाराजांच्या फौजेतही अनेक मुस्लिमांनी शौर्य गाजविले. महाराजांनी कधीही हिंदु-मुसलमान असा भेदभाव केला नाही. महाराजांनी प्रत्येक जाती-धर्माचा नेहमी आदर केला आहे. मुस्लिम समाजातील नव्या पिढिला छञपती शिवाजी महाराजांची ओळख निर्माण व्हावी तसेच महाराजांचा खरा इतिहास मुस्लिम समाजाला माहिती असावा या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, त्यामध्ये व्याख्याते व कार्यक्रमाचे अध्यक्ष निलेश धुमाळ पाटील, नाथाभाऊ शेवाळे, फैजल उर्फ पापाभाई पठाण, सिमाताई पवार, शकीलभाई मणियार, बौध्दाचार्य विश्वनाथ घोडके, शिवभक्त सुनिल मांजरे, प्रदिप कांबळे, शिवाजी शिंदे, रिजवान बागवान आदिंनी आपल्या भाषणातुन महाराजांच्या कार्याची व सैन्यातील मुस्लिम मावळ्यांच्या सहकार्याची माहिती दिली.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

या कार्यक्रमाला जनता दल (से) महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, सिमाई फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याच्या संस्थापक अध्यक्षा सिमाताई पवार, राष्ट्रीय मानव अधिकार (भारत) चे पुणे जिल्हा उपाध्यक्ष निलेश धुमाळ पाटील, प्रकल्पग्रस्त भुमीपुञ सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ उर्फ बंटी नवले, शिरूर तालुका कॉंग्रेस कमिटिचे उपाध्यक्ष फजलभाई पठाण, शिरूर शहर युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अमजदभाई पठाण, शिरूर तालुका कॉंग्रेसचे अल्पसंख्याक अध्यक्ष आजीमभाई सय्यद, गुरूकुल वस्तीग्रहाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंदे, बौध्दाचार्य विश्वनाथ घोडके, शिवभक्त सुनिल मांजरे, राजेंद्र क्षिरसागर, छायाताई सकट, साविञाताई शिंदे, मोतीराम उर्फ बापु निकुंभ, शकीलभाई मणियार, एकनाथ थोरात, कैलास वेताळ, अनिल जाधव, संतोष शिंगाडे, हजरतभाई बागवान, प्रदिप कांबळे, दत्ताभाऊ माने, फिरोज हवालदार, संतोष साळुंके, बापु येणारे, मच्छिंद्र पवार, आनंद वाघमारे, सुरज करंकाळ, विष्णु इंगळे, सुधाकर लोखंडे, गौतम मोरे आदि मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवभक्त व मुस्लिम मावळे मोठ्या संख्येंने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रिजवान बागवान केले तर आभार आजीमभाई सय्यद यांनी मानले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page