गजानन गव्हाणे पाटील
जय जिजाऊ, जय शिवराय, हर हर महादेव च्या जयघोषात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात कोरेगाव भीमा, ता. शिरुर येथील सनराईज इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये साजरी करण्यात आली.
यावेळी कोरेगाव भीमाचे माजी उपसरपंच अरविंद गव्हाणे, वढू बुद्रुक चे पोलीस पाटील जयसिंग भंडारे, उद्योजक बापूसाहेब दौंडकर आदींनी मुलांच्या कलागुणांचे कौतुक करत छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासाची व शौर्याची माहिती मुलांना समजून सांगणे गरजेचे असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी गायन, पोवाडा, नृत्य, लेझीम, पाळणा, शिवगर्जना, भाषण यांचे सादरीकरण केले.
याप्रसंगी संस्थेने अध्यक्ष भगवान भंडारे, उपाध्यक्षा मोहिनी फडतरे, सचिव ज्योती फडतरे, उद्योजक व माजी चेअरमन संजय फडतरे, ज्ञानेश्वर भंडारे, सचिन भंडारे, मोनिका भंडारे, शारदा भंडारे, शहाजी फडतरे, आनंदा फडतरे आदी प्रमुख मान्यवर व पालक, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतीक्षा लंघे – घुटे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती शिंदे, अनिता झावरे, शीला मेस्तरी, निर्मला मुरकुटे, शीतल ताठे, आरती मायने, गीता ढगे, अश्विनी उव्हाळे, मिलिंद गायकवाड, रोहिणी शिंदे, वंदनाकुमारी, सुजाता गवळी, मनीषा वाघमारे, संगीता पारखे, अमृता गव्हाणे, देवयानी वानखेडे या शिक्षकांनी शिवजयंती चे नियोजन व व्यवस्थापन केले.
सूत्रसंचालन स्वप्नाली घावटे यांनी केले. तर संस्थेचे सचिव व माजी उपसरपंच कांतीलाल फडतरे यांनी शिवगर्जना देत उपस्थितांचे आभार मानले.





