- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणगेनबा सोपानराव मोझे प्रशालेत शिवजयंती उत्साहात साजरी ; प्रशालेत अवतरली शिवशाही

गेनबा सोपानराव मोझे प्रशालेत शिवजयंती उत्साहात साजरी ; प्रशालेत अवतरली शिवशाही

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
जागतिक कीर्तीचे राजे, हिंदवी स्वराज्य संस्थापक, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज जयंती महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड येरवडा येथील गेनबा सोपानराव मोझे प्रशालेमध्ये प्राथमिक, माध्यमिक, (मराठी आणि इंग्रजी माध्यम ) प्रशाला मिळून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून संपन्न झाली.


ढोल लेझीम ताशांच्या गजरामध्ये शिवछत्रपतींची सवाद्य मिरवणूक, प्रेरणादायी मशाल प्रज्वलित करून “जय जिजाऊ, जय शिवराय” या घोषणांनी कार्यक्रमाला सुरुवात झाली. शिवजन्माचा पाळणा, शिवपराक्रमाविषयी विद्यार्थ्यांची व शिक्षकांची मनोगते, शिवछत्रपतींच्या कार्यकर्तृत्वाची महती सांगणारा व वीरश्री संचारणारा पोवाडा, शिवछत्रपतींच्या जीवनातील प्रेरणादायी ऐतिहासिक प्रसंग नाट्य, रायरेश्वराची प्रतिज्ञा, अफजल खान वध, भक्ती शक्ती, हिरकणी बुरुंज, अस्पृश्यता निवारण मूल्य जोपासण्याची शिकवण देणारे” पालखीचे खांदेकरी “असे विविध ऐतिहासिक प्रसंग नाट्य, सादर करून विद्यार्थ्यांनी शिवकालीन ऐतिहासिक स्मृतींना उजाळा दिला. कार्यक्रमाची सांगता छत्रपती शिवरायांच्या आरतीने झाली.


ढोल लेझीम पथकासाठी प्रशालेतील क्रीडा शिक्षक शरद देवरे, नथू जगदाळे, गुलाबराव उंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर राज्य गीत, स्फूर्ती गीतासाठी शिल्पा शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उपशिक्षिका अश्विनी धुमाळ यांनी उदे ग अंबे उदे अंबे उदे हे गोंधळ गीत सादर केले.


ऐतिहासिक प्रसंग नाट्य सादरीकरण, विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील वक्तृत्वसादर करण्यासाठी इतिहास शिक्षक संभाजी बो-हाडे, बाळासाहेब नेहे, संतोष थेऊरकर यांनी मार्गदर्शन केले.
गेनबा सोपानराव संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ मोझे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मोझे, शालेय समिती अध्यक्षा अलका पाटील, सदस्य संजय मोझे, प्रशालेचे प्राचार्य जालिंदर भागवत, उपमुख्याध्यापक लक्ष्मण यादव, पर्यवेक्षक मारुती दसगुडे, विभाग प्रमुख प्रल्हाद गायकवाड, सतीश सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनातून शिवजयंती कार्यक्रम उत्साहात साजरा झाला.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुधीर शिंगटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख अश्विनी गट, सुवर्णा नरवडे, कलाशिक्षक विनोद खिलारी, प्राथमिक, माध्यमिक (मराठी, इंग्रजी माध्यम) विभाग प्रमुख, मुख्याध्यापक तसेच सर्वशिक्षकांनी या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन व संयोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रशालेतील सहशिक्षिका उज्वला यादव यांनी मानले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page