गजानन गव्हाणे पाटील
छत्रपती शिवाजी महाराजांची युध्दनिती ही तत्कालिन इतर सत्तेपेक्षा वेगळी असून तिच्या बळावरच हिंदवी स्वराज्याची स्थापना करून तिचा विस्तार केला. या युध्दनितीचा अभ्यास आजच्या तरुणांनी केला पाहिजे असे प्रतिपादन शिवव्याख्याते बालाजी काशिद यांनी वाघोली, ता. हवेली येथील भारतीय जैन संघटनेच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात आयोजित केलेल्या शिवजयंती प्रसंगी मत व्यक्त केले.
पुढे ते म्हणाले शिवाजी महाराजांनी स्वतःचे आरमार तयार करून कोकण किनारपट्टीवर अनेक किल्ले बांधून परकिय आरमाराला शह दिला. आजच्या विद्यार्थ्यांनी शिवजयंती साजरी करताना शिवकाळातील विज्ञान समजावून घेण्यावर भर दिला पाहिजे असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गायकवाड यांनी कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानावरून मत व्यक्त केले.
एन.सी.सी. च्या विद्यार्थ्यांनी तुळापूर येथून शिवज्योत महाविद्यालयात आणली. प्रथम गोळे, निकिता कुंजीर, अभिषेक गुरव, साक्षी भोसले, सायली कंद, पुनम रोकडे, वैष्णवी चमरे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रम प्रसंगी प्रा. शिवाजी सोनवणे, प्रा. संजय मानवतकर, प्रा. अंगद साखरे, प्रा. सचिन कांबळे, डॉ. डी. एन. पाटील, डॉ. विकास बहुले, शशिकांत केसकर, गिरीष शहा, सविता औटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष वैष्णवी गवळी, अशुतोष खाडे, प्रथमेश दरेकर, यश पुंड, रोहन खिलारे, नेहल कांबळे यांनी केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. भूषण फडतरे यांनी केली. रोहन खिलारे यांनी सूत्रसंचालन तर नेहल कांबळे यांनी आभार मानले.





