गजानन गव्हाणे पाटील
पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यामध्ये वाघोली व परिसरात शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी तरूणांसह बालचमुनमध्ये मध्ये देखील मोठा उत्साह पाहवयास मिळाला.
छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ जय शिवराय या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. “देशाचा अभिमान छत्रपती शिवाजी, राष्ट्राची शान छत्रपती शिवाजी, स्वराज्याचे दुसरे नाव छत्रपती शिवाजी, संपूर्ण जगाचे दैवत छत्रपती शिवाजी असे शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत सर्वांनी महाराजांना मुजरा करून वंदन केले. तर बालकांनी वेगवेगळ्या प्रकारचे वेशभूषा परिधान केली होती.

शिवजयंती उत्सवानिमित्त तरूणांपासून अबालवृद्धासह बच्चे कंपनीमध्ये एक वेगळाच उत्साह,उर्जा,आनंद पाहावयास मिळाला. तर विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून छत्रपती शिवरायांना वंदन करण्यात आले.





