- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणशिवजयंतीच्या निमित्ताने मुस्लिम मावळ्यांच्या वतीने मिठाई वाटप,निबंध स्पर्धा व व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन

शिवजयंतीच्या निमित्ताने मुस्लिम मावळ्यांच्या वतीने मिठाई वाटप,निबंध स्पर्धा व व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन

- Advertisement -spot_img

शिरुर प्रतिनिधी-शकील मणियार
रयतेचे राजे छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्यसाधुन शिवजयंतीच्या निमित्ताने “आम्ही मुस्लिम मावळे छञपती शिवाजी महाराजांचे” शिरूर तालुक्याच्या वतीने वस्तीग्रहातील वंचित गोरगरिब मुलांना मिठाईचे वाटप,निबंध स्पर्धा,व्याख्यान आदि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन शिवभक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान मुस्लिम मावळ्यांनी केले आहे.
छञपती शिवाजी महाराजांच्या सैन्यांमध्ये अनेक मुस्लिम मावळे प्रामाणिकपणे उल्लेखनीय काम करित होते, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांमध्ये बहुसंख्य मुस्लिम होते. महाराजांच्या फौजेतही अनेक मुस्लिमांनी शौर्य गाजविले. महाराजांनी कधीही हिंदू मुसलमान असा भेदभाव केला नाही. महाराजांनी प्रत्येक जाती-धर्माचा नेहमी आदर केला आहे.
मुस्लिम समाजातील नव्या पिढिला छञपती शिवाजी महाराजांची ओळख व्हावी तसेच महाराजांचा खरा इतिहास मुस्लिम समाजाला घेता येईल या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती रिजवान बागवान शकील मणियार यांनी दिली.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

हा कार्यक्रम पुणे-अहमदनगर महामार्गावरील कासारी फाटा येथील आर्शिर्वाद ट्रष्ट संचलित गुरूकुल वस्तीग्रहामध्ये शिवजयंती च्या दिवशीच सायंकाळी ५ वाजता आयोजित केला असुन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार असुन परिसरातील शिवभक्तांनी, शिवप्रेमींनी, मुस्लिम मावळ्यांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येंने उपस्थित राहण्याचे आव्हान रिजवान बागवान व शकील मणियार यांनी केले आहे.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page