गजानन गव्हाणे पाटील
हर हर शंभो महादेव ” ओम नमो शिवाय ” च्या मंत्रात कोरेगाव भीमा, ता. शिरुर येथील सोमेश्वर या शिवमंदिरात महाशिवरात्रीच्या उत्सव जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.

सोमेश्वर शिव मंदिराची स्थापना २०१२ साली स्व. वामनराव सुदामराव भोसले यांनी मंदिराची पायाभरणी केली. तेव्हा पासून प्रत्येक वर्षी मंदिरात महाशिवरात्री, श्रावण सोमवारी भजन व धार्मिक विधी भक्तिमय वातावरणात करण्यात येतात. तसेच दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविक भक्तांसाठी भोसले कुटुंबाचे खिचडी फराळ वाटप करण्यात येत असल्याने फ्रेंड्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव दिलीप भोसले यांनी “आपली लोकशाही” शी बोलताना सांगितले.

महाशिवरात्री निमित्ताने महाभिषेक राजेंद्र भोसले व मंदा यांनी केला. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन दिलीप भोसले, सुनीता भोसले, संतोष भोसले, गणेश भोसले, सोमनाथ भोसले यांनी तर भाविकांना देण्यात येणाऱ्या फराळाचे नियोजन सोनाली भोसले, माधुरी भोसले आदींनी केले.

महाशिवरात्री निमित्ताने सोमेश्वर मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच महिला भजनी मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम मंदिरात पार पडला.





