- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणसंभाजी ठुबे यांच्या साहित्याचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

संभाजी ठुबे यांच्या साहित्याचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
सणसवाडी ता. शिरुर येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे विज्ञान शिक्षक संभाजी ठुबे यांनी ऐकोन पन्नासाव्या जिल्हा स्तरीय विज्ञान व गणित प्रदर्शनात सादर केलेल्या पेशी विभाजन या साहित्याला पुणे जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक गटातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले असून सदर साहित्य राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सादर होणार आहे.
विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकांनी वापरलेल्या नाविण्यपूर्ण पद्धती, कल्पकता व शिकणे सुलभ होण्यासाठी वापरलेले साहित्य याला प्रोत्साहन देण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग भारत सरकार यांच्या वतीने शिक्षकांसाठी सदर स्पर्धा तालुका, जिल्हा, राज्य व देश पातळीवर राबविली जाते. यामध्ये सणसवाडी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे विज्ञान शिक्षक संभाजी ठुबे यांनी सादर केलेल्या पेशी विभाजन या साहित्याला प्रथम क्रमांक मिळाला असता पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे, युवा वैज्ञानिक डॉ. प्रतीक मुणगेकर, पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे, उपशिक्षणाधिकारी निलेश धानापुने यांच्या हस्ते संभाजी ठुबे यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

तर ठुबे यांच्या साहित्याची राज्य पातळीसाठी साहित्याची निवड झाल्याबद्दल श्री नरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रंगनाथ हरगुडे, सचिव बाबासाहेब साठे, प्राचार्य बाबाजी गोरे, पंचायत समितीच्या सभापती मोनिकाताई हरगुडे, सरपंच संगिता हरगुडे, उपसरपंच दत्ताभाऊ हरगुडे, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर यांसह आदींनी अभिनंदन केले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page