गजानन गव्हाणे पाटील
वढू बुद्रुक ता. शिरुर येथील शिवले मळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना भौगलिक व ऐतहासिक विषयांतर्गत ज्ञान प्राप्ती व्हावी या हेतूने शिवजयंतीच्या निमित्ताने शिवनेरी सहलीचे आयोजन करत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली आहे.
वढू बुद्रुक ता. शिरुर येथील शिवले मळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील माता पालक समितीच्या वतीने शिवजयंती निमित्त सहलीचे नियोजन मार्गदर्शक वढू बुद्रुकचे माजी सरपंच अंकुश शिवले, माजी उपसरपंच संजय शिवले, शालेय समितीचे अध्यक्ष सर्जेराव शिवले, रेखा शिवले, प्रिया शिवले, संध्या आरगडे, वैशाली शिवले, रोहीणी वायकर, माधुरी पऱ्हाड, कल्याणी भंडारे, नीलम शिवले, जयश्री तनपुरे, आदर्श शिक्षक राजाराम सकट, रवींद्र शिवरकर यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शिवनेरी किल्ला व शिरोली बुद्रूक येथिल विघ्नहर सहकारी साखर कारखाना भेट सहलीचे आयोजन करण्यात आले होते, शाळेतील विद्यार्थ्यांना भौगलिक व ऐतहासिक विषयांतर्गत ज्ञान प्राप्त व्हावे हा हेतूने आयोजित सहलीत विद्यार्थ्यांसह शाळेच्या माजी विद्यार्थी व पालकांना देखील सहभागी करण्यात आले होते.

यावेळी शिवनेरी किल्ल्याची तटबंदी, भक्कम दरवाजे, बुरुंज, शिवाई देवी मंदिर, राजमाता जिजाऊ व बाल शिवाजी शिल्पकृती, छत्रपती शिवाजी महाराज जन्मठिकाण, कडेलोट स्थान, पाणी साठवण्याची सोय, विविध पशू पक्षी, जंगली झाडे, बगीचा, परीसर यांचे मुलांनी निरीक्षण केले. तसेच शिरोली बुद्रुक येथिल विघ्नहर सहकारी साखर कारखान्यातील मोठी मशिनरी, साखर उत्पादनाची पाहणी करत साखर खाण्याचा आनंद मुलांनी घेतला आणि नंतर अष्टवीनायक पैकी ओझर येथील गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन मुले आनंदाने घरी परतली.





