- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणन्हावी सांडस च्या उपसरपंचपदी अनामिका शितोळे बिनविरोध

न्हावी सांडस च्या उपसरपंचपदी अनामिका शितोळे बिनविरोध

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
हवेली तालुक्यातील न्हावी सांडस ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी अनामिका योगेश शितोळे यांची बिनविरोध निवड झाली. या अगोदर बायडाबाई सदाशिव निकम या उपसरपंच होत्या त्यांचा ठरलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. सरपंच नामदेव किसन शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली. त्यामध्ये अनामिका शितोळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.
या निवडीसाठी हवेली तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष तसेच संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष न्हावी सांडस विविध सहकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन माजी सरपंच योगेश दादा शितोळे, माजी सरपंच प्रदीप कांबळे, संदीप आण्णा शितोळे, पांडुरंग विश्वनाथ शितोळे, किसन वामनराव शितोळे, राजू पाटील शितोळे, संजय आबा शितोळे, पोलीस पाटील काळुराम खाडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष योगेश रामचंद्र शितोळे, संतोष शितोळे, भरत शितोळे, रणजीत पन्हाळे, रविराज खाडे, मोहन खाडे, हनुमंत शितोळे, पांडुरंग शितोळे आदी मान्यवर व ग्रामस्थांच्या सहकार्याने निवडणूक बिनविरोध पार पडली.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

उपसरपंच निवडी नंतर अनामिका शितोळे यांनी शिरूर हवेलीचे आमदार अशोक बापू पवार तसेच माजी सरपंच योगेश दादा शितोळे तसेच सरपंच नामदेव बापू शितोळे व सर्व सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गावचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे सांगितले व बिनविरोध निवडीसाठी सहकार्य केले त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे आभार मानले

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page