संपूर्ण रक्कम परत मिळवण्यास यश; लोणीकंद सायबर तपास पथकाची कामगिरी
गजानन गव्हाणे पाटील
एचडीएफसी बँकेच्या क्रेडीट कार्ड वरून ४ लाख ९६ हजारांची ऑनलाईन फसवणूक झाल्याप्रकरणी लोणीकंद सायबर तपास तात्काळ संबधित बँकांना पत्रव्यवहार करून संपूर्ण रक्कम परत मिळाल्यामुळे विजय नाथा रोटे यांनी सायबर तपास पथकाचे मनापासून आभार व्यक्त केले.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजय नाथा रोटे यांची एचडीएफसी बँकेच्या क्रेडीट कार्ड वरून ४ लाख ९६ हजारांची गुरुवार (दि. ९ फेब्रुवारी रोजी ऑनलाईन फसवणूक झाली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रोटे यांनी लोणीकंद पोलीस स्टेशन येथील सायबर तपास पथकाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार सायबर तपास पथकाने रक्कमेचे निरीक्षण करून मर्चंटला / बँकांना तात्काळ पत्रव्यवहार करून संपूर्ण रक्कम मिळवण्यास यश मिळवले. गेलेली एवढी मोठी रक्कम मिळाल्याने रोटे कुटुंबांनी लोणीकंद सायबर पथकाचे आभार मानले. यावेळी त्यांना गहिवरून आले होते.

सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मारुती पाटील यांचे मार्गदर्शनाखाली लोणीकंद सायबर तपास पथक प्रभारी पोलीस उपनिरीक्षक सुरज गोरे, पोशि समीर पिलाने, पोशि सागर पाटील, महिला पोशि कीर्ती नरवडे, महिला पोशि भोसले, महिला पोशि गोरे, महिला पोशि चव्हाण यांनी केली आहे





