निगुडघर प्रतिनिधी : बाबाजी साळेकर
महाराष्ट्र राज्य वीज कामगार पतसंस्था भोरच्या अध्यक्षपदी विश्वनाथ किंद्रे यांची तर उपाध्यक्ष संजय गव्हाणे तसेच सचिवपदी नितीन तारू यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वीज कामगार भवन येथे वीज कामगार पतसंस्थेची बैठक संस्थापक अध्यक्ष गोंविद (बापू) थोपटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष केशव बांदल व संचालक उपस्थित होते. अध्यक्षपदासाठी विश्वनाथ किंद्रे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणूक अधिकारी संजय पवार यांनी किंद्रे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. महाराष्ट्र राज्य वीज कामगार पतसंस्था भोर सन २०२३ ते २०२८ या वर्षासाठी बिनविरोध निवड करण्यात आली असून ती खालीलप्रमाणे वैशाली चौरे, स्वप्निल कुंभार, स्वप्निल ससाणे, अभयसिंह घारे,पांडुरंग शेलार, प्रकाश चौधरी, विजय भोसले, गौरी शिवतारे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

अधिकृत भागभांडवल १ कोटी २५ लाख असून कर्ज वाटप १ कोटी ७३ लाख आहे. सभासद संख्या १२० आहे तर आँडीटचा अ वर्ग आहे





