- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणनाटंबीमध्ये दत्त मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण स्थापना उत्साहात संपन्न

नाटंबीमध्ये दत्त मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण स्थापना उत्साहात संपन्न

- Advertisement -spot_img

हिरडस मावळ प्रतिनिधी : दीपक पारठे
भोर तालुक्यातील पश्चिम भागातील नाटंबी येथे श्री दत्त मूर्तीची स्थापना व कलशारोहण समारंभ विश्वचैतन्य परमपूज्य सद्गुरु नारायण महाराज यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात संपन्न झाली.
गेली दोन दिवस विविध भागातील नामांकित कीर्तनकारांची समाजप्रबोधनपर किर्तने झाली. शुक्रवारी सकाळी श्री दत्तमूर्ती व कलशाचे अकरा जोडप्यांच्या हस्ते पुजा रुद्र अभिषेक करत विधीपूवर्क पुर्ण झाले. त्यानंतर दुपारी सद्गुरूंची भव्य दिव्य मिरवणूक, ढोल पथक, भजनी मंडळातील मुले व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये अर्धा तास चालू होती. मिरवणूक वाजत गाजत नव्या दत्त मंदिराच्या जवळ आल्यानंतर प्रथम श्री दत्त मूर्तीची स्थापना सद्गुरु नारायण महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आली. त्यानंतर सुरेख मंदिराच्या शिखरावर कलशारोहण संपन्न झाले.


ग्रामस्थांच्या वतीने सद्गुरु नारायण महाराज यांचा यथोचित ग्रामस्थांच्या वतीने करताना मानाचा फेटा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह भेट देऊन करण्यात आला. श्री क्षेत्र नारायणपूर येथील मंदिर व्यवस्थापक भरत नाना शिरसागर व श्री दत्त मंदिर क्षेत्र नारायणपूरचे विश्वस्त प. पु . स्वामी पोपट महाराज यांचा देखील सत्कार करण्यात आला. यानंतर सद्गुरु नारायण महाराज यांनी ग्रामस्थांना व भाविक भक्तांना मार्गदर्शन व शुभ आशीर्वाद दिले. सद्गुरु नारायण महाराजांनी श्री दत्तगुरूंचे भजन करत सर्व परिसर मंत्रमुग्ध केला.
सर्व उपस्थित भाविक भक्त व ग्रामस्थ श्री दत्तगुरूंच्या आगमनाने आणि भजनाने वातावरण चैतन्यमय होऊन गेले. यानंतर सर्व ग्रामस्थांच्या व शिष्य परिवाराच्या उपस्थितत परमपूज्य पोपट महाराज स्वामी यांच्या शुभहस्ते नवग्रहाचे होम हवन मंत्रांच्या उच्चाराने विधीवत संपन्न झाले. होम हवनाचा कार्यक्रम झाल्यानंतर श्री दत्त मंदिर परिसरात सर्व भाविकांच्या उपस्थितीत महाआरती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. नाटंबी येथील ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नातून गावात भव्यदिव्य स्वरूपात श्री दत्त मंदिर व परिसराची उभारणी करण्यात आली होती. संपूर्ण गावाने यामध्ये सहभाग दाखवून कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे प्रयत्न केले. यावेळी श्री क्षेत्र नारायणपूर येथे शिष्यगण व मान्यवरांचा श्री दत्त कृपा मंडळ नाटंबी यांच्यावतीने सन्मान करण्यात आला.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

श्री दत्त मूर्ती स्थापना व कलशारोहण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नाटंबी गावातील ग्रामस्थ यशवंत खोपडे, शंकर खोपडे, नामदेव घाटे, भरत खोपडे, अंकुश खोपडे, ओंकार खोपडे, विनोद घाटे, पंढरीनाथ खोपडे, नवनाथ घाटे, विशाल खोपडे, शुभम खोपडे, पांडुरंग वाडकर, किरण खोपडे, सुरेश पोळ, पुंडलिक खोपडे, अमोल धोंडे, विकास खोपडे, समीर घोडेकर, पराग शिळीमकर, गणेश भागवत, संतोष मेढेकर, तानाजी चव्हाण व जयवंत बांदल यांनी मोलाचे योगदान दिले. या श्री दत्त मूर्ती व कलशारोहणाच्या भव्य दिव्य सोहळ्यात तालुक्यातील भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात भेट देऊन दर्शन घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास अभ्यासात संतोष खोपडे यांनी करून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक विठ्ठल दानवले यांनी केले तर गणेश घाटे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page