गजानन गव्हाणे पाटील
पुढील महिण्यात धर्मपंढरी श्रीक्षेत्र वढू बुद्रुक येथे २१ मार्च रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी तथा बलिदान दिनाच्या कार्यक्रम निमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागामार्फत शंभूराजांचा ज्वलंत इतिहास समाजासमोर जाण्यासाठी भव्य-दिव्य कार्यक्रम घेण्यात यावा असे निवेदन देऊन राज्याचे सांस्कृतिक व वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे विनंती केली असल्याची माहिती कामगार मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे यांनी आपली लोकशाहीस दिली.

या बाबत मुनगंटीवार यांनी या कामी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी चंद्रपूर युवा मोर्चा उपाध्यक्ष आकाशदादा वानखेडे, केदारदादा खडके व इतर मान्यवर उपस्थित होते.






