- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणराष्ट्र उभारणीसाठी युवक हीच खरी प्रेरणा : महेशबापू ढमढेरे

राष्ट्र उभारणीसाठी युवक हीच खरी प्रेरणा : महेशबापू ढमढेरे

- Advertisement -spot_img

प्रतिनिधी : पवन फुफाणे
युवाशक्ती हीच खऱ्या अर्थाने राष्ट्र उभारण्याची प्रमुख प्रेरणा असून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून युवकांवर श्रम संस्कार होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन तळेगाव ढमढेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळ व पुण्यातील विद्या सहकारी बँकेचे विद्यमान संचालक महेशबापू ढमढेरे यांनी केले.
आमदाबाद, ता. शिरूर येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालय तळेगाव ढमढेरे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. आमदाबाद च्या विद्यमान सरपंच सविता माशेरे, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सोपानराव भाकरे, संचालक सुहास थोरात, प्रसिद्ध उद्योजक बाळासाहेब डांगे, माजी सरपंच पोपटराव घुले, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष साईनाथ घुले, शिरूर तालुका किसान काँग्रेस चे प्रमुख रामदास थोरात, आमदाबाद विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन अशोक माशेरे, पोलीस पाटील दिलीप साळवे ,ग्रामपंचायत सदस्य अविनाश सोनार, राजेंद्र शिंदे, सामाजिक कार्यकर्ते संजय थोरात, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सुनील जगताप, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक नवले, मुख्याध्यापक नामदेव गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सोमनाथ पाटील, प्रा. डॉ. संदीप सांगळे, प्रा. मीनाक्षी दिघे यांच्यासह विविध मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
महेश बापू ढमढेरे पुढे म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजना ही खऱ्या अर्थाने आदर्श युवक घडवण्याची कार्यशाळा आहे. खरा भारत हा शहरात नसून खेड्यात आहे. बदलत्या परिस्थितीमध्ये युवकांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून आपले कुटुंब व परिसराचे नाव उज्वल करावे असे आवाहनही महेश बापू ढमढेरे यांनी याप्रसंगी केले.
घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सोपानराव भाकरे व सुहास थोरात यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. महात्मा गांधी यांना अपेक्षित असलेला खेड्यातील भारत घडविण्यासाठी महादेव युवकांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी दोघांनीही युवकांना केले.
येतो का किसान काँग्रेसचे अध्यक्ष रामदास थोरात यांनी युवकांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सुसंस्कार आत्मसात करण्याचे आवाहन केले. आजच्या काळातही खरा भारत शोधण्यासाठी आपल्याला खेड्यामध्ये यावे लागते. त्यामुळे महाविद्यालयीन तरुणाईने सामाजिक बांधिलकी जोपासणे काळाची गरज असून राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर त्यासाठी उत्तम पर्याय असल्याचेही त्यांनी याप्रसंगी स्पष्ट केले.
याप्रसंगी विविध मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. संदीप सांगळे यांनी आपल्या प्रास्ताविकामधून राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिर आयोजनामागील हेतू विशद केला. दत्तात्रय कारंडे यांनी सूत्रसंचालन तर कार्यक्रम अधिकारी सोमनाथ पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

सदरील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये महाविद्यालयातील १०० युवक – युवती सहभागी झाले. प्रस्तुत शिबिरात ग्रामस्वच्छता अभियान वृक्षारोपण पर्यावरण, जनजागृती, ग्राम सर्वेक्षण, शिवार फेरी, अंधश्रद्धा निर्मूलन, इत्यादींसारखे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page