- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणहडपसर ते थेऊर कोलवडी पीएमपीएमएल बससेवा आता केसनंदमार्गे वाघोलीपर्यंत सुरू

हडपसर ते थेऊर कोलवडी पीएमपीएमएल बससेवा आता केसनंदमार्गे वाघोलीपर्यंत सुरू

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
पीएमपीएमएलला मिळणाऱ्या रोजच्या उत्पन्नात वाढ होत असल्याने पुणे महानगर मंडळाकडून नवीन दहा मार्गांवर बस सेवा सुरू करण्यात आली आहे तर काही मार्गांचा विस्तार शुक्रवारी (दि.३) पासून करण्यात आला आहे. यामध्ये हडपसर ते थेऊर-कोलवडी पर्यतची बससेवा आता केसनंदगाव मार्गे वाघोली पर्यंत असणार आहे.
या बससेवेमुळे वाघोली व केसनंद भागातील प्रवाशांना सर्वाधिक फायदा होणार असल्यामुळे वाघोली ते सोलापूररोड वरील लोणीकाळभोर, कदमवाकवस्ती व इतर गावे बसच्या माध्यमातून जोडली गेली आहेत. या मार्गावर ३ बसेस प्रवाशांसाठी असणार आहेत तर प्रत्येक ५० मिनिटांच्या अंतराने बस उपलब्ध होणार आहे.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

वाघोली पीएमपीएमएल बस डेपो येथून पुर्ण क्षमतेने १०५ बसेसचे संचलन होत असून दररोज जवळपास ६ लाखांहून अधिक उत्पन्न येथून पीएमपीएमएलला मिळत आहे. पुणे शहरातील व ग्रामीण पट्ट्यातील बहुतांश भागाला बस मार्गाने वाघोली जोडले गेले असल्याने मागील काही वर्षांपासून बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page