- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणपुणे बार असोसिएशनच्या अध्यक्ष पदी अॅड. केतन कोठावळे तर सचिव पदी अॅड....

पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्ष पदी अॅड. केतन कोठावळे तर सचिव पदी अॅड. राहुल कदम

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
पुणे बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीत अॅड. केतन कोठावळे यांनी अध्यक्षपदासाठी झालेल्या लढतीत निर्विवाद वर्चस्व राखत विजत मिळविला. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेद्वार ॲड. राहुल दिंडोकर यांचा 1 हजार 230 मतांनी पराभव केला. कोठावळे यांना 2 हजार 728 मते मिळाली. असोसिएशनच्या उपाध्यक्षपदासाठी झालेल्या लढतीत अॅड. विश्वजीत पाटील यांना 3 हजार 10 तर अॅड. जयश्री चौधरी – बीडकर 2 हजार 234 मते मिळाली.
सचिवपदासाठी अॅड. राहुल कदम यांना 2 हजार 719 व अॅड. गंधर्व कवडे यांना 2 हजार 491 मते मिळाली. तर, खजिनदारपदासाठी 2 हजार 791 मते मिळवून अॅड. समीर बेलदरे यांनी विजयावर शिक्कामोर्तब केला. आडिटर म्हणून अॅड. अजय देवकर यांची तसेच कार्यकारिणी सदस्यपदी अॅड. अमोल वडगणे, ऍड. प्रमोद नढे, ऍड. मयुरी कासट, ऍड. संजय खैरे, ऍड. रेश्मा चौधरी, ऍड. श्रध्दा जगताप, ऍड. राहुल प्रभुणे, ऍड. ऋषिकेश कोळपकर, ऍड, चंद्रसेन कुमकर आणि ऍड. सचिन माने यांची यापुर्वीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
निवडणूकीसाठी प्रमुख निवडणूक अधिकारी म्हणून अॅड. अमित गिरमे यांनी कामकाज पाहिले तर उप निवडणूक अधिकारी म्हणून अॅड. दिलीप जगताप, अॅड. माधवी पोतदार, अॅड. शरद कुलकर्णी, अॅड. कांताराम नप्ते आणि अॅड. सिद्धेश्वर चौधरी यांनी कामकाज पाहिले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page