- Advertisement -spot_img
Homeशालेयज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसमेंलन उत्साहात संपन्न

ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसमेंलन उत्साहात संपन्न

- Advertisement -spot_img

शिरुर : प्रतिनिधी
जीवनात कोणत्याही परिस्थितीला आपण आत्मविश्वासाने जीवनाला सामोरे गेल्यास यश हे नक्कीच मिळते असे आवाहन अभिनेते भारत गणेशपुरे यांनी केले.


येथील ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कूल शिरूरच्या वार्षिक स्नेहसमेंलनास ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेत्री श्रेया बुगडे व अभिनेते भारत गणेशपुरे यांनी हजेरी लावली. या दोन्ही कलावंताच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्याच्या सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना अभिनेते भारत गणेशपुरे विद्यार्थानसमोर बोलताना म्हणाले की, जीवनात स्वंत: वर प्रचंड आत्मविश्वास असला पाहिजे असे सांगुन आपल्या शालेय जीवना पासुन ते अभियन क्षेत्रापर्यत झालेल्या जीवन प्रवास त्यांनी सांगितला. तर अभिनेत्री श्रेया बुगडे यांनी ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रात टॉपर व्हा ! असा सल्ला विद्यार्थ्याना दिला. तर भाउराव कऱ्हाडे म्हणाले की, परिस्थितीचा बाऊ न करता आहे त्या परिस्थितीला सामोरे जा.
तीन दिवस हे वार्षिक स्नेहसमेंलन पार पडले. या तीन दिवसाच्या काळात सिने दिग्दर्शक भाउराव कऱ्हाडे, आमदार निलेश लंके, आमदार राहुल कुल, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल बाबुराव पाचर्णे, संपदा पतसंस्थेचे अध्यक्ष प्रभाकर डेरे आदीनी स्नेहसमेंलनास हजेरी लावली. ज्ञानगंगा संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजाराम घावटे, उपाध्यक्ष दीपक घावटे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन घावटे आदीनी प्रमुख पाहुण्याचे स्वागत केले.

” आपली लोकशाही ” या मराठी न्युज पोर्टल साठी बातमीदार व जाहिरात प्रतिनिधी नियुक्ती करणे आहेत. संपर्क : 7840900090 whatsapp

प्री-प्राइमरी ते इयत्ता आठवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभाग घेऊन आपले कलागुण सादर केले. कार्यक्रमाचे शीर्षक ‘यादें’ असे होते. बॉलीवूडमधील जुन्या ते नवीन अभिनेत्यांवर चित्रित झालेल्या गाण्यांवर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांच्या मुकअभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. तसेच विद्यार्थ्यांनी लता मंगेशकर यांच्या आठवणींना नृत्यातून उजाळा दिला. मुख्याध्यापिका रुपाली जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षिका कविता मॅडम व शोभा अनाप मॅडम आणि प्रियांका मॅडम, रावसाहेब चक्रे यांनी केले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page